शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

बेळगाव जिल्ह्यात शांततेत ७६ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 23:58 IST

बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी शनिवारी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने सरासरी ७६.१८ टक्के मतदान झाले.

बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी शनिवारी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने सरासरी ७६.१८ टक्के मतदान झाले. सर्वाधिक ८४ टक्के मतदान चिकोडी सदलगा मतदारसंघात,तर सर्वांत कमी ६१.५७ टक्के

मतदान बेळगाव दक्षिण मतदारसंघात झाले. मंगळवारी (दि. १५) मतमोजणी होणार आहे. शहरातील आर. पी. डी. कॉलेजमध्ये १८ मतदारसंघांची मतमोजणी करण्यात येणार आहे.

बेळगाव उत्तर मतदारसंघात सकाळच्या सत्रात चुरशीने मतदान झाले होते. बूथ क्रमांक १८५ मध्ये महिला पोलिसांना बुरखा काढून चेहरा दाखविण्यास एका महिलेने विरोध केल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. हनुमान नगर भागात घरातील सदस्य संख्येपेक्षा अधिक मतदार असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी करून मतदान केंद्राबाहेर निदर्शन केली.

महिला मतदारांची मतदान संख्या वाढावी या उद्देशाने दोन बूथ गुलाबी रंगाचे उभारण्यात आले होते. या दोन्ही बूथमध्ये सर्व महिला मतदान कर्मचारी होते. उत्तर मतदारसंघात एका व्यक्तीकडून मतदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. जिल्हा प्रशासन संबंधित व्यक्तीचा शोध घेत आहे.निपाणीत उत्साहात ८० टक्के मतदाननिपाणी : निपाणी मतदारसंघात अपवाद वगळता शांततेत ८०.७८ टक्के मतदान झाले. सकाळी सात वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. मतदारांना अमिष दाखवून काही ठिकाणी पैसे वाटपाचे प्रकार घडल्याने काहींना बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.बेळगाव जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारीनिपाणी ८०.७८, चिकोडी-सदलगा ८४.६५ अथणी ८०, कागवाड ७९.९८, कुडची ७५.८६, रायबाग ७७.४८, हुक्केरी ७८.४२, अरभावी ७६.२९, गोकाक ७१.७९, यमकनमर्डी ७९.८९, बेळगाव उत्तर ६३.१८, बेळगाव दक्षिण ६१.५७, बेळगाव ग्रामिण ७७.५२, खानापूर ७१.८०, कित्तूर ७८.४२, बैलहोंगल ७७.९२, सौंदत्ती ८०.०५, रामदुर्ग ७५.३०.हुक्केरी मतदारसंघात ७८ टक्के मतदानसंकेश्वर: हुक्केरी मतदारसंघात ७८.४२ टक्के मतदान झाले. येथे भाजपचे उमेश कत्ती व कॉँग्रेसचे ए.बी.पाटील यांच्यात लढत आहे. हुक्केरी शहरात भाजप-कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वादावादी झाली.

बेळगावातील २०३ जणांचे भवितव्य मतपेटीत बंदबेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले. बेळगावात दुपारी पावसाची शक्यता असल्याने सकाळपासून शहरासह उपनगरात मतदारांच्या रांगा वाढल्या होत्या.जिल्ह्यात एकूण १८ जागांसाठी ३७ लाख ३७ हजार मतदार आहेत. त्यापैकी महिला १८ लाख ३४ हजार, तर पुरुष १८ लाख ८८ हजार मतदार आहेत. एकूण ४४१६ मतदान केंद्रे असून, त्यातील ८३६ अति संवेदनशील आहेत. या १८ मतदारसंघांत २०३ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी १८४ पुरुष, तर १९ महिला उमेदवार आहेत. निवडणुकीसाठी २४,२८८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बेळगाव ग्रामीणमधून एकीकरण समितीचे मनोहर किणेकर, काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर, भाजपचे संजय पाटील, बेळगाव दक्षिण समितीचे किरण सायनाक, भाजपचे अभय पाटील, काँग्रेसचे एम. डी. लक्ष्मी नारायण, मध्यवर्ती समितीचे प्रकाश मरगाळे, तर खानापुरातून समितीचे विलास बेळगावकर, काँग्रेसच्या अंजलीताई निंबाळकर, जेडीएसचे नासिर बागवान, भाजपचे विठ्ठल हलगेकर, मध्यवर्ती समितीचे अरविंद पाटील, बेळगाव उत्तरेतून काँग्रेसचे फिरोज सेठ, भाजपचे अनिल बेनके, समितीचे बाळासाहेब काकतकर रिंगणात आहेत. एकीकरण समितीत दोन-दोन उमेदवार उभे आहेत. या सर्वांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnatakकर्नाटक